गोवा

गोवा काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाची नवी टीम जाहीर

पणजी : अखिल भारतीय काँग्रेस समितीने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या सोशल मीडिया विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदी हिमांशू तिवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिंकन गोम्स आणि अजमल सय्यद यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


विभागाच्या समन्वयकपदी सोहन शेणई, मॅक्लिन फर्नांडिस, प्रतिभा बोरकर, ग्लेन लार्सेडा आणि आर्मांडो फेरेरा अल्वारेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


काँग्रेसची विचारधारा, धोरणे आणि कार्यक्रम डिजिटल माध्यमांद्वारे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच जनतेचे प्रश्न सोशल मीडियावर मांडण्याची जबाबदारी नव्या टीमकडे असेल.


विशेषतः युवा वर्गाशी संवाद वाढविणे, जनतेच्या प्रश्नांना डिजिटल व्यासपीठावर स्थान देणे आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणे यासाठी नवी टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास गोवा प्रदेश काँग्रेस समितीने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!