लेख

मन्ही अहिरानीकर्ता

​ – डॉ. सुधीर रा. देवरे

 शब्दालय प्रकाशनाकडून ‘भाषा अहिराणी’ हे अहिराणी माध्यमातील माझे भाषाविषयक पुस्तक २६ मार्च २०२६ ला प्रकाशित झाले. या पुस्तकातील ‘लेखकनं म्हननं’ म्हणजे हा लेख.

१६ जानेवारी २०२४ ले संध्याकाळे धुळातीन जगदीश देवपूरकर आनि डॉ. सदाशिव सूर्यवंशी यास्ना (कॉन्फरन्स) फोन वना. रामराम शामशाम जयं आनि त्यास्नी सांगं, ‘‘२५ फेब्रुवारी २०२४ ले सातवं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन घेनं शे आनि तुम्ही त्यानं अध्यक्षस्थान घेवानं शे, आशा आमना सगळास्ना- धुळाना खान्देश साहित्य संघना आग्रह शे.’’ (ह्या संमेलनमा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यास्नाबी सहभाग व्हता.)

मी लगेच म्हंतं, ‘‘तुमना प्रेमना माले आदर असना तरी आते माले चालता येत नही आनि उलशी पायथोरीबी चढता येत नही, म्हनीसन मी आता कथाच जात नही. आपू गैरसमज करी घिऊ नका.’’

त्या म्हनेत, ‘‘आम्ही तुमनी सगळी काळजी घिसूत. व्हिलचेअर राही तुमले. पन अध्यक्ष तुम्हीच पायजेत. तुमनं काम मोठं शे. हाऊ मान तुमले यानं आगोदरच मिळाले पायजे व्हता. पन आता नही म्हनू नका.’’

म्हंतं, ‘‘माले इचार कराले दोन याळ द्या.’’

त्या म्हननात, ‘‘त्यामा काय इचार करना. दोन मानसं कायम तुमनी काळजी घेवाले सोबत ऱ्हातीन. सकाळीजनं सत्र जयं का तुम्ही निंघी जा. पन नही म्हनू नका. आमले अध्यक्ष तुम्हीच पायजे यंदा.’’

​म्हंतं, ‘‘तरीबी इचार कराले दोन याळ पायजेतच माले.’’

म्हनेत, ‘‘बरं चालई. परो करतंस फोन. पन व्हकारच द्या बरका.’’

१८ जानेवारीले संध्याकाळे बरोबर त्याच येळे आखो दोन्हीस्ना फोन वना. म्हनेत, ‘‘मंग नक्की ना? जाहीर करी टाकतंस सकाळ.’’

‘‘तब्बेत माले साथ देत नही… पन तुमना या प्रेमना आग्रहखातीर आनि अहिरानी मायकर्ता माले नही म्हनाले जीववर यी ऱ्हायनं. इसू मी. पन माले आता चालता येत नही, हायी ध्यानात राहू द्या, व्हिलचेअर लागईच.’’

‘‘ती काहीच काळजी करू नका. आम्ही लागतंस कामले मंग.’’

‘‘बरं.’’

पायस्पशी आबळावामुळे उलसा २ वरीसना व्हतू तैन्हपशी चालाले- पायऱ्या चढाले आवकाळ्या करन्या पडेत (पोलिओ). पन यान्ह आगोदर हात टेकी का व्हयेना पन घरन्या- गाडीन्या- जिनान्या पायथोऱ्या कशातरी चढू. तरीबी बडोदा, तेजगड, छोटा उदयपूर, भोपाळ, दिल्ली, कलकत्ता, म्हैसूर आठे अहिरानी भाषा मांडाकर्ता- अहिरानी लोकसंस्कृती जताडाकर्ता कटाळा कया नही- त्या त्या येळे जायी वनू. ‘अहिरानी ढोल’ना संपादनकर्ता बडोदाना भाषा केंद्रमा ते दर सहा महिनातून चक्कर व्हये.

काही येस्टीतून ते काही आगगाडीतून झडा दी ह्या दूरदूरना प्रवास कयात. पन जठे जावानं गरजनं वाटनं तठेच. (नेमकाच जागे आजपावत गऊ. फक्त तब्बेतमुळे आशे नही, काही तत्वसमुळे संमेलनं- भाषणं- कविता वाचन आजपावत टाळत वनू. पन भाषा आणि लोकसंस्कृतीकरता नेमक्या जागा टाळू ना.) नेमकी जागे जानंबी आता पायस्ले झेपत नही… झोल जास… खाल बठनू त्ये ऊठता येत नही. आता पायथोर्‍या ते दूरच पन मोकळं चालताबी येत नही. हायी बाब आजूनबी बराच लोकस्ले माहीत नही. (ज्यास्नी समोरासमोर आजून गाठभेट नही, त्यास्ले मन्हा आधुपनबद्दल माहीत नही. मीबी हाटकून सांगत नही.) पन आज सांगनं वनं, त्याले इलाज नही…

१९ जानेवारीपशी मन्हा सगळा बाकीना कामं बंद करीसन अहिराणीवर अध्यक्षीय भाषण लिव्हाले घिदं. रातपहाटकरी हायी भाषण १० फेब्रुवारीपावत लिव्हता लिव्हता पुरं कयं. सगळं मुद्दानं मांडता मांडता हायी भाषण ६९ पानस्नं व्हयी गयं. आवढं भाषण ते संमेलनमा बोलता येनार नही, म्हनीसन ते आखो भयान उलसं करत १५ पानस्वर आनं आनि डॉ. सदाशिव सूर्यवंशी सरकडे छापाकर्ता (संमेलनमा आयकनारास्ले वाटाकर्ता) धाडी दिधं. त्यास्नी आखो पैभारे काटछाट करीसन ते आठ पानस्मा बसाडं. संमेलनमाबी मुद्दानं फक्त १५ पानातलं भाषन लोकसमोऱ्हे (येळकाळना गणितमुळे) सांगानं ठरायं. पन तेबी माले तठला येळना गणीतमा बसाडीसन जशेनतशे मांडता वनं नही. आटोपतं घेनं वनं. त्यामाबी काटछाट करनी पडनी.

म्हंजे सांगाना मुद्दा काय ते ह्या संमेनना अध्यक्ष-भाषणमा अहिरानी भाषाकर्ता मी ज्या काही मुद्दाना इचार मांडी ठियेल व्हतात त्या लोकसमोर्‍हे आजून सगळा जशानतशा वना नहीत. मंग ह्या ६९ पानंस्नी येगळी पुस्तिका काढानी गरज वाटनी. त्या मुद्दा टहाळबन करता करता मजकूर वाढीसन तो आखो ८८ पानंसपावत गया. आनि ते सगळं भाषण म्हंजेच आता प्रकाशित व्हयनं ते ‘भाषा अहिराणी’ हायी पुस्तक. बाकी मी काय मांडं ते पुस्तकमा आता सगळं इयेलच शे. ते आठे आखो कितलं घडी घडी आखूड करी सांगवा.

पुस्तक : भाषा अहिराणी  (भाषाविषयक पुस्तक)

लेखक : डॉ. सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

पुस्तकाचे प्रकाशन : २६ मार्च २०२६
मुखपृष्ठ : सरदार जाधव

पृष्ठ संख्या : ८८, किंमत : १६० रूपये.

​(२५ फेब्रुवारी २०२४ ले नेर – धुळामा भरेल ७ वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलनना अध्यक्षपदवरतीन बोलाकर्ता लिहेल अध्यक्षीय भाषण म्हंजे हायी पुस्तक​)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!