सिनेनामा 

आसाम रायफल्सच्या शौर्याला संगीतमय मानवंदना

महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लखेरा यांच्या हस्ते गीताचे अनावरण

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर आणि दुर्गम भागांत कार्यरत असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांचे शौर्य, धैर्य आणि समर्पण यांना अभिवादन करण्यासाठी नुरावी प्रॉडक्शन्सच्या वतीने विशेष देशभक्तिपर गीताची निर्मिती करण्यात आली आहे. आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लखेरा यांच्या हस्ते दलाच्या वार्षिक कार्यक्रमात या गीताचे अनावरण करण्यात आले.

आसाम रायफल्सच्या जवानांचे बलिदान, निस्वार्थ सेवा आणि राष्ट्राप्रती असलेली अढळ निष्ठा या गीतातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशसेवेचे व्रत स्वीकारलेल्या जवानांच्या शौर्याला संगीताच्या माध्यमातून मानवंदना देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गीताच्या अनावरणप्रसंगी उपस्थित जवान आणि मान्यवरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाविषयी बोलताना नुरावी समूहाचे अध्यक्ष रवी रंजन चौबे म्हणाले, “आसाम रायफल्सच्या शूर जवानांना संगीतमय मानवंदना अर्पण करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या संरक्षणासाठी जवानांनी केलेले बलिदान, त्यांचे धैर्य आणि समर्पण यांची दखल समाजाने घेतली पाहिजे. शब्दांपलीकडे जाऊन संगीताच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या गीतामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल आणि जवानांच्या योगदानाची जाणीव निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.”

या विशेष उपक्रमाची दखल घेत कार्यक्रमात आसाम रायफल्सच्या वतीने रवी रंजन चौबे यांचा सन्मानही करण्यात आला. नुरावी प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

संगीताच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि जवानांच्या शौर्याची व त्यागाची आठवण समाजाला करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे नुरावी प्रॉडक्शन्सकडून सांगण्यात आले. या गीताला प्रेक्षक आणि श्रोत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कंपनीच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर हे गीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!