प्रीतिसंगमवर मगरीचा हल्ला; एकजण जखमी
कराड (अभयकुमार देशमुख) :
येथील प्रीती सन्मावर शुक्रवारी सकाळी पोहायला गेलेल्या सोमवार पेठेतील मधुकर थोरात यांच्यावर पोहताना मगरीने अचानक हल्ला केला प्रीतीसग्मावरील जागवेल जवळ ते पोहत असताना मगरीने त्यांचा पाय पकडला मधुकर थोरात यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी धाडसाने मगरीला झटका देऊन पाय सोडवून ते काठावर आले.
त्यांच्या पायाला मोठी जखम झाली असून त्यांना पोहणाऱ्या लोकांनी तात्काळ कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.. मगरीच्या या हल्ल्यामुळे कराड व परिसरात खळबळ उडाली असून प्रीतीसंगमावर मगर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.. गेल्या काही दिवसात प्रीतीसंगमापासून काही अंतरावर गोटे व सैदापूरच्या ग्रामस्थांना मगरीने दर्शन दिले होते.