google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘वेदांता’ने केली रोखेधारकांना परतफेड

वेदांता रिसोर्सेस लिमिटेडने (व्हीआरएल/वेदांता) घोषणा केली आहे की, ३.२ बिलियन डॉलर्सच्या रोख्यांची परिपक्वता ज्यामध्ये २०२९ पर्यंत यशस्वीपणे वाढवण्यात आली होती, अशा यावर्षीच्या सुरुवातीला मिळालेल्या संमतीनुसार रोखेधारकांना परतफेड करणे ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण केले आहे.

व्हीआरएलला हे सांगताना आनंद होत आहे की, हे पूर्ण झाल्यामुळे, व्हीआरएलमधील कर्ज परिपक्वता अधिक समान पद्धतीने पसरल्या गेल्या आहेत आणि आमचे हेच उद्दिष्ट होते.

वेदांता समूहाने गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात डीमर्जर आणि रिऑर्गनायझेशनची एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली होती. यामुळे वेदांता समूहाची १७ प्रमुख व्यवसायांमध्ये पुनर्रचना केली जाईल. प्रत्येक व्यवसायामध्ये जागतिक स्तरावरील व्यवस्थापन नेतृत्व आहे, सर्वात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानांना उपयोगात आणले जाते आणि इम्पोर्ट सब्स्टिट्यूशन आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. हे व्यवसाय इन्स्टिट्यूशनल आणि रिटेल गुंतवणूकदारांना एकसमान, उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण गुंतवणूक संधी देतात. अंमलबजावणीतील प्रगतीची माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!