अर्थमत/ टेक्नॉलॉजी

TVS Jupiter ची ड्युअल-टोन Spectral रेंज दाखल

बेंगळुरू : TVS Motor Companyने ११० सीसी श्रेणीतील Jupiter स्कूटरची नवीन Dual Tone Spectral Range बाजारात आणली आहे. या नव्या रेंजमध्ये Spectral Blue आणि Spectral Copper हे दोन ड्युअल-टोन रंग उपलब्ध करण्यात आले आहेत. या नव्या रंगसंगतीसोबतच स्कूटरमध्ये काही नवीन सुविधा आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत.


नवीन Jupiterमध्ये ११० सीसी स्कूटर श्रेणीत प्रथमच Sequential Turn Signal Lamps (TSL) देण्यात आले आहेत. यामुळे स्कूटरच्या लाइटिंगमध्ये वेगळी ओळख निर्माण होण्याबरोबरच दृश्यमानताही सुधारण्याचा दावा कंपनीने केला आहे.


नवीन रंगसंगतीला रंगसुसंगत इनर पॅनेल्स, नवीन सीट फिनिश आणि पार्टिअल क्रोम मिरर्सची जोड देण्यात आली आहे. रायडर आणि पिलियनसाठी इंटिग्रेटेड बॅकरेस्टसह प्रीमियम लाँग सीट देण्यात आली आहे. तसेच प्रवासादरम्यान उपकरणे चार्ज करण्यासाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.


स्कूटरमध्ये कंपनीचे SmartXonnect कनेक्टेड तंत्रज्ञान कायम ठेवण्यात आले असून, त्यामध्ये नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. कार्यक्षमतेसाठी TVS iGO Assist देण्यात आले असून, यामुळे अॅक्सेलरेशन आणि इंधन कार्यक्षमतेत सुधारणा होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.


Jupiterमध्ये पूर्वीप्रमाणेच ३३ लिटर अंडर-सीट स्टोरेज उपलब्ध आहे. या जागेत दोन हेल्मेट ठेवता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे.


TVS Motor Companyचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदर म्हणाले, “भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजांनुसार TVS Jupiterमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आली आहे. नवीन Dual Tone आवृत्तीत डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”


कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या १३ वर्षांत Jupiterमध्ये सातत्याने बदल करण्यात आले आहेत. २०२४मध्ये सादर करण्यात आलेल्या नव्या Jupiterमध्ये २९ Best-in-Class आणि Segment-First वैशिष्ट्ये देण्यात आली होती.


नवीन Jupiter Dual Tone Spectral Rangeमध्ये ११३.३ सीसी सिंगल-सिलिंडर, चार-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५.९ किलोवॅट पॉवर आणि TVS iGO Assistच्या मदतीने ९.८ Nm पर्यंत टॉर्क निर्माण करते.


किंमत ₹८९,८२५

नवीन TVS Jupiter Dual Tone Spectral Range लवकरच अधिकृत TVS Motor डीलरशिपमध्ये उपलब्ध होणार आहे. या मॉडेलची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹८९,८२५ आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!