स्फोटानंतर परळी हादरलं; वन परिमंडळ कार्यालयात स्फोट
सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील परळी येथील वन परिमंडळ कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजता मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
कार्यालयातील पत्रा ,दारे खिडक्या खिडक्या पुढून काही अंतरावर पडल्या असून यावेळी वनविभागाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता , या घटनेची माहिती मिळताच वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले . याठिकाणी नेमका कशाचा स्फोट झाला याची माहिती पोलीस घेत आहेत.
पहा व्हिडीओ:
या घटनेनंतर परळी वन परिमंडल कार्यालय पुन्हा चर्चेत आले असून परळी वन परिमंडल कार्यालय नेहमीच यां न त्या कारणाने चर्चेत असते. आज पहाटे झालेला स्फोट हा जिलेटिन बॉम्बसदृश्य वस्तूचा असावा अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होत आहे अशा वस्तू भरवस्तीत असलेल्या कार्यालयात कश्या काय ठेवण्यात आल्या ? जप्ती चा माल असेल तर तो संबंधित कार्यालयातच पंचनामा करून ठेवावा लागतो या पाठीमागे काय गौडबंगाल आहे हे पोलिस तपासात समोर येणार का ?
…