बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यास ठोसेघरात अटक
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठोसेघर येथे राज्यभरात अनेक पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तसेच परिसरातील लोकांना जास्त दराने बेकायदेशीर विनापरवाना दारू विक्री होत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून ठोसेघर येथे एकाला अटक केली.
या दरम्यान एक हजार चारशे रुपयांच्या दारुच्या बाटल्यासह विक्री करणाऱ्या किसन रामचंद्र बेडेकर यांस सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे . याप्रकरणी प्रवीण मारुती वायदंडे (पोलीस नाईक) यांनी फिर्याद दिली असून यासंबंधी अधिक तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.
मात्र ठोसेघर परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरटी दारु विक्री केली जाते, एकावर कारवाई करून भागणार नाही तर सातारा तालुका पोलीसांनी परिसरातील बेकायदेशीर धंद्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.