ईडीची कारवाई; ‘यंग इंडियन’ कार्यालयाला ठोकले टाळे
नॅशल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय हे कार्यालय खोलू नये असे निर्देश ईडीने दिले आहेत. याआधी या प्रकरणात ईडीकडून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे देशभरात मोदी सरकार तसेच ईडीविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आता ईडीने ही कारवाई केली आहे.
नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी ईडीने दिल्लीस्थित हेराल्ड इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले आहे असून परवानगीशिवाय हा परिसरात खुला करु नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत. याआधी ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकून तपास केला होता.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली. याच कारणामुळे काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभर आंदोलनं केली होती. ईडीने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खरगे यांचीदेखील चौकशी केली आहे. जून महिन्यात सलग पाच दिवस ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीने त्यांची जवळपास ५० तास चौकशी केलेली आहे.