दस्तुरखुद्द मुख्यमत्र्यांचेच बेकायदेशीर हॉटेल बांधकामाला अभय?
सातारा:
महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री महाबळेश्र्वर येथे त्यांच्या खाजगी दौऱ्या निमित्त आलेले असताना बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेल ब्राईट लॅन्ड येथे मुक्कामी उतरले असल्याचे वृत्त आहे.
महाबळेश्र्वर येथील कित्येक सामाजिक पर्यावरण प्रेमींनी या बाबत वेळोवेळी या बाबत तक्रारी दाखल केल्या असताना ,त्या बाबत कायदेशीर कार्यवाहीचे अपेक्षा असताना अश्या वादग्रस्त हॉटेल मध्ये स्वतः मुख्यमंत्री जर राहत असतील तर एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचे त्यांना अभय आहे की काय असा प्रश्न उभा राहतो.
जर त्यांना ही गोष्ट माहीत नसेल तर त्यांची गोपनीय यंत्रणा काय करते आहे, स्थानिक जिल्हाधिकारी यांनी या बाबत अहवाल घेतला नव्हता का , त्यामुळे मुख्यमंत्रीच जर अश्या ठिकाणी राहत असतील तर कार्य वाहीची भूमिका घेणार कोण, त्यामुळे संबधित हॉटेल ची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या बेकादेशीर बांधकामावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी इशारा दिला आहे.