google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘या’ पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा आज होणार जाहीर…

नवी दिल्ली:

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) सेमीफायनलच आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर ( Mizoram and Telangana Election) होण्याची दाट शक्यता आहे. साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे.



सध्या पाच राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगड ( Chhattisgarh, Rajasthan Election) दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. लोकसभेच्या निवडणुकापूर्वी या राज्यातून काँग्रेसला किती मतदान होणार याची चाचणी या निवडणुकांमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशची (Madhya Pradesh Election) निवडणूक देखील चर्चेत आहे. कारण भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील बड्या नेत्यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे तिकिट अद्याप जाहीर झालेले नाही त्यामुळे त्यांच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. शिवराजसिंह चौहान हे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का हे भाजपने जाहीर केलेले नाही. भाजपला ही राज्यं आपल्याकडे ठेवण्यात यश येतं का याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल.
या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असतील त्यामुळे अतिशय रंजक निवडणूक असणार आहे. या पाच राज्यासाठी काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्रीय समितीसह सर्वच पक्ष या निवडणुकीत आपली ताकद लावताना दिसणार आहेत.


या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असतील त्यामुळे अतिशय रंजक निवडणूक असणार आहे. या पाच राज्यासाठी काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्रीय समितीसह सर्वच पक्ष या निवडणुकीत आपली ताकद लावताना दिसणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!