गोवा

‘गुज’च्या नव्या कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

पणजी :
गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (जीयूजे)च्या २०२६-२०२८ या कार्यकाळासाठी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीने शुक्रवारी पदभार स्वीकारला. यानिमित्ताने पणजी येथील संघटनेच्या कार्यालयात निवृत्त होत असलेल्या आणि नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची संयुक्त बैठक पार पडली.


या बैठकीत पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सदस्यांचे कल्याण आणि संघटनेची परंपरा जपण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.



नव्या कार्यकारिणीमध्ये राजतिलक नाईक यांची अध्यक्षपदी, किशोर केशव नाईक गावंकर यांची उपाध्यक्षपदी, वासुदेव पागी यांची सरचिटणीसपदी, ॲशली डी’रोझारिओ यांची कोषाध्यक्षपदी, उपेंद्र नाईक यांची संघटन सचिवपदी आणि सगुण गावडे यांची संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली.


कार्यकारिणी सदस्य म्हणून अजय लाड, गौरी मळकर्णेकर, समीर अशोक नाईक, संदीप देसाई आणि विल्यम रॉड्रिग्ज यांची निवड झाली आहे.


तसेच अमरेश परब, हिरू म्हाळे, कान्झिल रॉड्रिग्ज, लौकीक शिलकर, मार्कस मर्गुल्हाओ आणि प्रज्ञा राणे यांची कार्यकारिणीवर सहनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!