गोवा

भाजप ओबीसी मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेशाने ओबीसी मोर्चाच्या नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या मान्यतेनंतर या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


नव्या कार्यकारिणीत प्रदीप शेट यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत सावंत, राजेंद्र गावंकर, वसुधा तारी आणि कान्होबा नाईक यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजेंद्र कांबळी आणि डॉ. सत्यवान हरमळकर यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


तसेच सुदेश कोळगावकर, जानी गुणो दामेकर, उद्देश हळदणकर आणि कांती राजेंद्र मयेकर यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संजय सुर्लेकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.


याशिवाय अनिता प्रकाश नाईक, निलेश वायंगणकर, निशा हळदणकर, कृष्णा दत्ता सातरकर, नीता धर्मा कांडोलकर, राजू कुतुस गावंकर, प्राजक्ता प्रकाश कन्नाईक, रेश्मा फडते, माया नारायण कारापूरकर आणि सुलेखा चिकलेकर यांचा सदस्य म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.


प्रसिद्धीपत्रकानुसार, नव्याने नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी राज्यातील ओबीसी समाजाशी संघटनात्मक संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्य करणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!