
BSWA तर्फे अंगणवाडीतील बालकांना रेनकोट व छत्र्यांचे वाटप
फोंडा :
भट्टी सोशल वेल्फेअर असोसिएशन (बीएसडब्ल्यूए)तर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर फोंडा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘मान्सून प्रोटेक्शन ड्राइव्ह’ सुरू करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडीतील बालकांना रेनकोट आणि छत्र्यांचे वाटप करण्यात येत असून, पावसाळ्यात मुलांना सुरक्षितपणे अंगणवाडीत ये-जा करता यावी, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बालकल्याण, शिक्षण आणि समाजहिताच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याच्या बीएसडब्ल्यूएच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
फोंडा मतदारसंघातील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये येत्या काही दिवसांतही रेनकोट आणि छत्र्यांचे वाटप सुरू राहणार असल्याची माहिती संस्थेने दिली.







