गोवा

कोंकणी साहित्य व भाषा सेवा पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्ट रोजी

पणजी : गोवा कोंकणी अकादमीतर्फे २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीचे कोंकणी साहित्य व भाषा सेवा पुरस्कार २० ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. गोवा विद्यापीठ, ताळगाव येथे होणाऱ्या कोंकणी राष्ट्रीय मान्यता दिनाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातील, असे कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.


कार्यक्रमाला सायंकाळी ३.३० वाजता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील सभागृहात (ब्लॉक ई) सुरुवात होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. भाग्येश झा आणि राजभाषा संचालनालयचे सचिव प्रसाद लोलयेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. साहित्यिक महाबळेश्वर सैल आणि मेघनाथ परब यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.


कोंकणी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल लेखक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच विविध संस्थांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांतील पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा यावेळी सत्कार केला जाईल.


कार्यक्रमादरम्यान दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे. त्यामध्ये शंताराम आमोणकर यांच्या ‘शणै गोंयबाब एक वळख’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा समावेश आहे. शणै गोंयबाब यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त ही आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. जयंती नाईक संपादित ‘साहित्य संवाद’ या पुस्तकाचेही प्रकाशन होईल. या पुस्तकात ज्येष्ठ लेखकांच्या मुलाखतींचा समावेश आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!