google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

Olympic 2024 : भारतीय हॉकी संघाने कोरले कांस्यपदकावर नाव

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. त्याचबरोबर भारताचे हे एकूण चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय देशाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. यासह भारतीय हॉकी संघाने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

वास्तविक, भारतीय हॉकी संघाने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सलग २ पदके जिंकली आहेत. यापूर्वी १९६० ते १९७२ पर्यंत भारताने हॉकीमध्ये सलग ४ पदके जिंकली होती. त्यानंतर १९७६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला एकही पदक मिळाले नाही. यानंतर १९८० मध्ये सुवर्णपदक जिंकले.

१९८० पासून भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी तळमळत होता. त्यानंतर ४० वर्षांनंतर पदकाचा दुष्काळ संपला आणि भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून ५२ वर्षांनंतर इतिहास घडवला आहे. १९७२ नंतर भारताने हॉकीमध्ये सलग दोन पदके जिंकली आहेत. १९६८ आणि १९७२ मध्येही भारताने सलग दोन कांस्यपदके जिंकली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत (८ ऑगस्ट) ४ पदके जिंकली आहेत. चारही कांस्यपदके मिळवली आहेत. मागील तीन कांस्यपदके नेमबाजीत जिंकली आहेत. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकेरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत दुसरे कांस्य मिळवले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. आता हॉकीमघ्ये भारताला चौथे कांस्यपदक मिळाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!