‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन
चेन्नई :
स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांचे आज (28 सप्टेंबर) गुरुवारी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. स्वामीनाथन यांच्या पश्चात पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन आहेत.
भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं.
स्वामिनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (1986) प्राप्तकर्ते आहेत.