अंगापुर रस्त्याचे खोदकाम काम करून ठेकेदार गायब
टिटवेवाडी :
सातारा तालुक्यातील अंगापूरफटा ते अंगापूर या दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम चार महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराने ऐन पाऊसाळ्यात तीन किलोमीटर रस्त्यांची साईडपट्टी दीड ते दोनफुटा पर्यत उकरून डांबरी रस्त्यावर खडीचे ढीग टाकले आहेत.अशी परिस्थिती असताना हे काम अर्धवट सोडून गेली चार महिन्यापासून ठेकेदार गायब झाला आहे.त्यामुळे ही परिस्थिती अनेक वाहनधारकांच्या जीवावर बेतली असुन ठेकेदार हाजीर हो.अशी अर्त हाक वाहनधारक देत आहेत.
सातारा -रहिमतपूर-विटा या मुख्य राज्यमार्गाला जोडणार अंगापूर ते अंगापूर फटा हा रस्ता परीसरातील गांवासाठी वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. साखर कारखान्यामुळे ऊस पट्ट्यातील या रस्त्यावर दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे.त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब विचात घेवुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.ठेकेदाराने जून महिन्याच्या दरम्यान ऐन पावसाळ्यात या कामाला सुरुवात केली. मुख्य रस्त्याच्या एका बाजूचा जवळपास तीन किलोमीटर रस्ता जेशिबी मशिनच्या सहाय्याने डांबरा पासून दीड ते दोन फुट उकरला ठेवला आहे.
दरम्यान मुख्य रस्त्याच्या आर्धाया डांबरावर खडीचे ढिग टाकले आहेत.टाकलेल्या या खडीमुळे रस्ता अपुरा पडत आहे. अपुर्या रस्त्यामुळे बाजूच्या साईडपट्टीवरून वाहने चालवली लागत आहेत.या साईडपट्टीवर वाहतूकीने व पाऊसामुळे त्या बाजूलाही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होवून वाहनचालक जायबंदी झाले आहे.दरम्यान हा रस्ता वाहनचालकांच्या जीवावर उठला आहे.त्यामुळे ठेकेदाराच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने वाहनचालक सणासुदीच्या काळात शिमगा करीत आहेत.
गेली चार महिन्यापासून या रस्त्याचे काम ठप्प आहे.या अर्धवट कामामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. या रस्त्यावरून वाहनचालक जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काम सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.
– मच्छिंद्रनाथ नलवडे,
सदस्य ग्रा.प.अंगापूर वंदन
अनेक साखर कारखान्यांचा ऊस तोडणीचा हंगाम सुरू होत आहे. या रस्त्यावरून परीसरातील कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असते. असे असताना या रस्त्यांच्या कामाची अवस्था पहाता येत्या काळात या रस्त्याच्या काम सुरू झाले नाही तर वाहतूकीची मोठी गैरसोय होणार होवून अपघात घडण्याची शक्यता आहे.