शंभूराज देसाई यांच्यावर संजय राऊत यांचे तोंडसुख…
सातारा (महेश पवार) :
खासदार संजय राऊत हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना आज पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री यांनी शेण खाल्लं म्हणत त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाने शेण खाल्ले , म्हणत संजय राऊत यांनी सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर कराड येथील पत्रकार परिषदेत जहरी टीका केली.
सातारा पोवई नाका येथील शिवतीर्थ परिसरात मोकळ्या जागेत लोकनेते स्व बाळासाहेब देसाई यांचे स्मारक आयलँड उभा करन्यावरुन राजघराण्यातील दोन्ही राजे व शिवप्रेमी विरुद्ध देसाई असा वाद निर्माण झाला होता, मात्र याच परिसरात लोकनेत्याचे स्मारक होणारच असा दावा करून प्रशासन आणि सरकार आमचं आहे . असे म्हणणाऱ्या देसाई यांना खासदार राऊत यांनी चांगलेच फोडून काढले.
लोकेनेते स्व.बाळासाहेब देसाई हे मोठे नेते होते, परंतु त्यांच्या नातवाने शेण खाल्लं आहे. बाळासाहेब देसाई हे लोकनेते आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही., लोकनेते स्व. बाळासाहेब देसाईंचा पण योग्य सन्मान झाला पाहिजे मात्र त्यावरून वाद घालणं हट्ट करणं अशोभनीय आहे. यातून सुयोग्य तोडगा सामंजस्यता दाखऊन काढला पाहिजे. लोकनेते बाळासाहेब देसाई राज्याचे गृहमंत्री होते ते कायम शिवसेनेच्या पाठीशी राहिले होते याची आठवण करून देत राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर तोंडसुख घेतले.