google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडासातारा

कोल्हापूरच्या राज पटेल यांच्या मृत्यूने मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट

सातारा (प्रतिनिधी )

सातारा रनर्स फाउंडेशन च्या वतीने आयोजित अकराव्या सातारा हाफ फिल्म मध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या सातारकरांनी धावण्याचा रविवारी चांगलाच जोश दाखवला , साडेसात हजार स्पर्धकांनी फिटनेससाठी धाव घेतली. मात्र या स्पर्धेमध्ये कोल्हापूर येथील राज पटेल या स्पर्धक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्पर्धेला गालबोट लागले या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त होत आहे.

सातारा पोलीस परेड ग्राउंड येथून स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी झेंडा दाखवून केले . ही स्पर्धा पोलीस परड ग्राउंड पोवई नाका शाहू चौक माची पेठ समर्थ मंदिर बोगदा पावर हाऊस सांबरवाडी यवतेश्वर निवांत हॉटेल प्रकृती रिसॉर्ट व नित्य मुक्त साई रिसॉर्ट येथून पुन्हा माघारी अशा 21 किलो मीटरच्या टप्प्यामध्ये स्पर्धकांना चांगलाच दमसास दाखवावा लागला यंदाच्या स्पर्धेमध्ये तब्बल देशातील आणि परदेशातील अशा साडेसात हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता उत्कृष्ट कौशल्यपूर्ण वैद्यकीय ज्ञान असणारे कुशल संयोजक कूलिंग स्टेशन पॉईंट तात्काळ मदत सुविधा आणि धावकांना मिळणारे चिअर अप हे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते धावकांचे ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आले.



सातारा शहरांमध्ये रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून हिल मॅरेथॉनचे वारे जाणवत होते त्याकरता पोलीस कवायत मैदान ते बोगदा यादरम्यानची वाहतूक सकाळी 11 वाजेपर्यंत अन्य मार्गाने वळवण्यात आली होती अनेक सातारकरांनी स्पर्धेमध्ये जोश पूर्ण सहभाग दाखवला पुणे मुंबई गोवा नाशिक बेंगलोर यासह परदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंनी यामध्ये सहभाग घेतल्याचे स्पर्धा संयोजकांनी सांगितले अत्यंत नैसर्गिक पद्धतीने चढणीच्या डोंगर रस्त्यांवर जाणाऱ्या या स्पर्धेतला जगातील अनेक मॅरेथॉनपटूंनी पसंती दिली आहे त्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी स्पर्धकांच्या सहभागाचा नवीन उच्चांक नोंदवते आहे. 2012 मध्ये पहिल्यांदा भरलेल्या पहिल्या हिल मॅरेथॉनमध्ये 12 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यंदा अकराव्या हिल मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये तब्बल साडेसात हजार इतका उच्चांकी सहभाग नोंदवला गेला.

यादरम्यान कोल्हापूर येथील स्पर्धक राज पटेल वय 32 राहणार मार्केट यार्ड कोल्हापूर यांचा येवतेश्वर घाट उतरल्यानंतर धावत असताना अचानक तोल जाऊन कोसळण्याचा प्रकार घडला संयोजकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेमध्ये घेऊन सातारा जिल्हा रुग्णालय गाठले मात्र दहा मिनिटानंतर त्यांचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!