सातारा
शिवतीर्थला नाव देण्यावरून वादंग…
सातारा (महेश पवार) :
मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या सातार्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्यावरून सातार्यात वादंग निर्माण झाला आहे.
संतापलेल्या एका सातारकरांने थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाच सवाल करत शिवतीर्थ काय पालकमंत्र्यांच्या बापाचा आहे का? नाव बदलण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात घडेल असा सज्जड इशारा दिला, यामुळे साताऱ्यातील वातावरण चांगले तापले आहे.