google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

‘निवडणुक आली की गोड बोलणाऱ्या उदयनराजेंना मदत का करायची?’

सातारा (महेश पवार) :

सातारा जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती.

दरम्यान या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांना लोकसभेच्या निवडणुकीत का मदत करायची? का त्यांना पाठिंबा देयचा ? फक्त निवडणुकीपुरते गोड बोलणाऱ्या उदयनराजेंना का मदत करायची असा सवाल बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे यांना केला.


दरम्यान यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठी पर्यंत पोहोचवतो वाटल्यास वरिष्ठांच्या समवेत बैठक लावू त्यामध्ये तुमची मतं व्यक्त करा, पण महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे काम आपल्याला करावे लागेल. पक्षाने आपल्याला भरभरून दिलं त्यांची परतफेड आपल्याला करायची यामुळे टोकाची भूमिका घेऊ नका म्हणत आमदार शिवेंद्रराजे नी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगत आठ तारखेचा मेळावा मोठ्या दिमाखात पार पाडा असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!