
सातारा नगरपालिकेवर बापटांचे सरकार!
सातारा (महेश पवार) :
सत्ता कोणत्याही राजेंची असली तरी दोन्ही राजेंचे प्रशासकीय कंट्रोल हे अभिजित बापट आपल्या कार्यपद्धतीने करतानाचे सातारा पालिकेत चित्र असून , जरी दोन्ही राजें एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात दोन्ही राजेंना व त्यांच्या कार्यकर्त्यांना कसं आणि कुठं कंट्रोल करायचं हे माहिती असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या डोक्यावर तान येऊ नये म्हणून सातारा पालिकेत मुख्याधिकारी असलेले अभिजित बापट वर्षानुवर्षे अपवाद वगळता सातारा पालिकेच्या खुर्चीवर कायम असल्याने सातारा पालिकेत बापटांचे सरकार असल्याची चर्चा सुरू आहे .
सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पुणे महापालिकेत पदोन्नती होऊन बदली होऊन सुध्दा बापट यांना दोन दिवस सातारा आणि तीन दिवस पुणे महापालिकेत असे कामकाज असताना दरम्यान च्या काळात जिल्ह्यातील पालिका प्रशासनाचा पदभार बापट यांच्याकडेच दिल्याने महाराष्ट्रात बापटांच्या एवढा कर्तव्यदक्ष अधिकारी नाही का काय अशी संबंध सातारकरांच्या मध्ये चर्चा सुरू आहे.