
गोवा
आषाढीनिमित्त फोंड्यात रंगला ‘विठ्ठला पांडुरंगा’
राजेश्री क्रिएशन्स आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंग विठ्ठल या भक्तिपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे करण्यात आले. कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मानसी केळकर आणि दूरदर्शन कलाकार हेमंत बर्वे यांच्या मनमोहक सादरीकरणांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या समवेत गोव्यातील सुप्रसिद्ध गायक गायिकांनीही आपली सुरेल प्रस्तुती दिली.
