गोवा

‘विशेष’ मुलांच्या कलागुणांचा होणार ‘उमंग’ गौरव

राजेश्री क्रिएशन्सचा ७ रोजी सांखळीत खास उपक्रम

​राज्यातील विशेष ​मुलां​च्या कलागुणांना मंच देण्यासाठी आणि त्यांना समाजापुढे साकारात्मकदृष्ट्या सादर करण्यासाठी  ‘उमंग ​: सेलिब्रेट एव्हरी अबिलिटी’ ​ या विशेष उपक्रमाचे ७ मार्च रोजी रवींद्र भवन, सांखळी येथे ​आयोजन करण्यात आले आहे.​ राजेश्री क्रिएशन्स गोवा आणि केशव सेवा साधना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा ​कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राज्यभरातील सुमारे ​३०० विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक या​मध्ये आप सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. ​

एकदिवसीय या कार्यक्रमात एकल गायन, भारतीय लोकनृत्य, फायरलेस कुकिंग, कथाकथन आणि शुभेच्छापत्र निर्मिती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ​’विशेष​’ मुलांना सुरक्षित आणि प्रोत्साहनपर ​मंच उपलब्ध करून देणे तसेच समाजात समावेशकतेबाबत जागरूकता निर्माण करणे​. आणि ‘विशेष​’ मुलांच्या क्षमता, जिद्द आणि सर्जनशीलतेचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे​आयोजक राजेश्री क्रिएशन्सच्या वतीने सांगण्यात आले.

या​ कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री ​डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार चंद्रकांत शेट्ये, दिव्यांग ​आयुक्तालयाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सांखळी नगरपरिषद अध्यक्षा सिद्धी प्रभू परोब, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, केशव सेवा साधना अध्यक्ष सागर शेट्ये, व्यवस्थापक मकरंद कामत आणि राजेश्री क्रिएशन्सचे संस्थापक परेश पी. नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समारोप व पारितोषिक वितरण समारंभास समाजकल्याण आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार प्रेमेंद्र शेट, केशव सेवा साधना गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. गोविंद हेगडे देसाई, सचिव लक्ष्मण (नाना) बेहरे, केशव सेवा साधना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना प्रभुदेसाई आणि राजेश्री क्रिएशन्सच्या संचालिका ​प्रज्ञा पी. नाईक उपस्थित राहणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!