गोवा

‘मडगांवचो आवाज’तर्फे “म्हजें मडगांव, म्हजें गार्डन” अभियान

मडगाव – मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी “म्हजें मडगांव, म्हजें गार्डन” हे अभियान सुरू करून नागरिकांना ऐतिहासिक मडगाव नगरपालीका उद्यानाच्या रक्षणासाठी सक्रिय पूढे येण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी उद्यानाचे महत्त्व, वारसा आणि त्याच्या रक्षणाची गरज अधोरेखित करणारे व्हिडिओ तयार करून शेअर करावेत, असे आवाहन प्रभव नायक यांनी केले आहे.


सर्व गोमंतकियांना या सामूहिक प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहन करत, प्रभव नायक यांनी “मडगाव नगरपालीका उद्यान हे केवळ हिरवळ असलेले ठिकाण नसून शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक आहे, जे पिढ्यान्पिढ्या जपले गेले आहे” असे नमूद केले.


गोव्याची अस्मिता जपलेल्या ओपिनीयन पोलच्या ६० व्या वर्षानिमित्त, प्रभव नायक यांनी नागरिकांना सदर ऐतिहासीक घटनेतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “आपल्या पूर्वजांनी जशी गोव्याची ओळख जपण्यासाठी एकजूट दाखवली, तशीच आपणही आपल्या या ऐतिहासिक उद्यानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया,” असे ते म्हणाले.



या अभियानाचा प्रारंभ मडगावला एका खेड्यातून शहराचा दर्जा मिळाल्याच्या २४८ व्या वर्धापनदिनाचे औचीत्य साधून करण्यात आला. ३ एप्रिल १७७८ रोजी राजाज्ञेद्वारे मडगावला अधिकृतपणे शहराचा दर्जा देण्यात आला होता, असे नायक यांनी नमूद केले.


“म्हजें मडगांव, म्हजें गार्डन” या अभियानाच्या माध्यमातून मडगांवचो आवाज नागरिकांची मजबूत लोकचळवळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे मडगाव नगरपालीका उद्यानाचे विनाशापासून रक्षण होऊन ते भावी पिढ्यांसाठी जतन केले जाईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक वारशाच्या रक्षणासाठी आपला आवाज बुलंद करावा, असे कळकळीचे आवाहन प्रभव नायक यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!