अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ भारतात दाखल

बंगळुरू : दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी TVS Motor Company ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर मालिकेत ‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ हे नवीन मॉडेल सादर केले आहे. या नवीन स्कूटरची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत अनुदानासह १,३७,१४२ रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या स्कूटरला आयडीसी प्रमाणित १७५ किलोमीटरची रेंज मिळते.


भारतभरातील ९ लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास मिळवलेल्या ‘टीव्हीएस आयक्यूब’ मालिकेत हे नवीन मॉडेल अधिक मोठ्या बॅटरीसह सादर करण्यात आले आहे. दैनंदिन वापरासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही स्कूटर उपयुक्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.


नवीन मॉडेलमध्ये ‘मॅग्निफिसन्स पर्पल बेज’ आणि ‘हार्लेक्विन ब्लू बेज’ हे दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले असून ‘टायटॅनियम ग्रे मॅट’ हा रंगही उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘टीव्हीएस आयक्यूब एस ४.७ केडब्ल्यूएच’ विकसित करताना तीन बाबींवर विशेष भर देण्यात आला. ग्राहकांना अधिक रेंज, कनेक्टेड फीचर्स आणि रंग पर्याय उपलब्ध करून देणे, सुरक्षिततेसाठी नव्या नियमांचे पालन करणे आणि रायडिंग अनुभव अधिक सुलभ व त्रासमुक्त ठेवणे या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!