सिनेनामा 

गोवा क्रांती दिनानिमित्त रंगमंचावर ‘देश राग’

सांखळी : गोवा क्रांती दिनानिमित्त नॉलेज टर्मिनस आणि परिक्रमा आर्टिस्ट्स कलेक्टिव्ह, रविंद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने गाजलेल्या ‘देश राग’ या कोंकणी नाटकाचे दोन विशेष मोफत प्रयोग १८ जून रोजी रविंद्र भवन, सांखळी येथे सादर करण्यात येणार आहेत.

या नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. गोव्याच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या बाळा राया मापारी यांच्या संघर्षमय जीवनाचा पट या नाटकातून उलगडला जातो. या नाटकात प्रसिद्ध अभिनेता रोहित खांडेकर, विश्वप्रताप पवार, पृथा परब यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील तुलनेने दुर्लक्षित राहिलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगातून करण्यात येत असल्याचे नॉलेज टर्मिनसच्या वतीने सांगण्यात आले. प्रभावी अभिनय, संगीत आणि नेपथ्याच्या माध्यमातून गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास रंगमंचावर सजीव करण्यात येणार आहे.

गोवा क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या नाट्यप्रयोगाद्वारे गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले.


विद्यार्थ्यांसाठी खास प्रयोग

श्रीकांत गावडे दिग्दर्शित आनी युगांक नायक लिखित हे नाटक ५० व्या कोंकणी नाट्यस्पर्धेत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले होते.  विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत हे नाटक पोहोचावे, यासाठी एकाच दिवशी दोन मोफत प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोग होणार असून सायंकाळी ७.३० वाजता सर्वांसाठी खुला प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!