गोवासिनेनामा 

वास्कोत ‘देश राग’चा उद्या खास प्रयोग

वास्को :  ‘देश राग’ या गाजत असलेल्या कोंकणी नाटकाचा विशेष प्रयोग २१ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता रवींद्र भवन, बायना-वास्को येथे सादर करण्यात येणार आहे.  नॉलेज टर्मिनस, परिक्रमा आर्टिस्ट्स कलेक्टिव्ह आणि वास्को रविंद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.


गोव्याच्या मुक्तीसाठी लढा देणारे आणि बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांच्या संघर्षमय जीवनाचा पट या नाटकातून उलगडला जातो. या नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हे स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तर रोहित खांडेकर, पृथा परब आणि विश्वप्रताप पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. युगांक नायक यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन श्रीकांत गावडे यांनी केले आहे.


गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील तुलनेने दुर्लक्षित राहिलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगातून करण्यात येत असल्याचे नॉलेज टर्मिनसच्या वतीने सांगण्यात आले. प्रभावी अभिनय, संगीत आणि नेपथ्याच्या माध्यमातून गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास रंगमंचावर सजीव करण्यात येणार आहे.


नुकत्याच झालेल्या गोवा क्रांती दिनानिमित्त सांखळी येथे दोन हाऊसफुल प्रयोग झाल्यानंतर, वास्कोतील रसिकांकडून नाटकाला विशेष मागणी मिळाल्याने हा प्रयोग रवींद्र भवन येथे आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!