शिवेंद्रसिंहराजेनी केली शांतीत क्रांती…
सातारा (महेश पवार) :
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आज शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत होणार होते, मात्र ते होण्याआधी उदयनराजेंनी संभाजीनगर गाठत त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी उभं केलेलं मडप व शेड उध्वस्त करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला परंतु शिवेंद्रसिंहराजेनी शांततेची भुमिका घेत कार्यक्रम स्थळ गाठलं.
दरम्यान दुसऱ्या बाजूने उदयनराजे व त्यांचे सहकारी कार्यक्रम स्थळावर आले दरम्यान दोन्ही गट आमनेसामने आले यावेळी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली व दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील लोकांना शांततेचे आवाहन केले, यावेळी उदयनराजे यांच्याकडून ही जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला यावेळी शिवेंद्रसिंहराजेनी देखील ही जागा बाजार समितीच्या मालकीची आहे असा दावा करण्यात आला जर आम्ही काही चुकीचे केले असले तर आमच्यावर गुन्हे दाखल करा म्हणत शांततेत भूमिपूजन उरकलं, दरम्यान या ठिकाणी उदयनराजेंनी देखील पेयजल योजनेचं भूमिपूजन केले.
दरम्यान संभाजीनगर येथील उदयनराजे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर या ठिकाणचे वातावरणात चांगलेच तापले होते मात्र शिवेंद्रसिंहराजेनी त्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असताना देखील शांततेची भूमिका घेऊन शांतीत क्रांती घडवून आणल्याचे चित्र पहायला मिळाले.
संभाजीनगरच्या १७ एकराच्या दाव्यानंतर उदयनराजेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज? असल्याची चर्चा येथे जमलेल्या जनमाणसातून उमटत होती, कारण संभाजीनगर येथे उदयनराजेंच्या कार्यकर्त्यां पेक्षा शिवेंद्रसिंहराजेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांधी टोप्या घालून आलेल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले.
यामुळे शिवेंद्रसिंहराजेनी अभयसिंहराजे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत ग्रामीण भागातील लोकांच्या मधील आपुलकी व लोकप्रियता जपल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले.