google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडा

दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री बोडगेश्वर, रॉयल स्ट्रायकर्स ठरले विजेते

मडगाव :
अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण युवा संघाची दैवज्ञ क्रिकेट चषक स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी एस.ए.जी मैदान, फातोर्डा येथे पार पडली. हे स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. या स्पर्धेत श्री बोडगेश्वर (पुरूष गट) आणि रॉयल स्ट्रायकर्स (महिला गट) यांनी जेतेपद पटकावले.
या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या समारोप समारंभास नितीन रायकर, संचालक, अग्निशमन आणि आपत्कालिन सेवा संचालनालय, गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. तसेच पंढरीनाथ उर्फ संदिप शांबा अन्वेकर, अध्यक्ष, श्री कालिका मंदिर, कासारपाल हे सन्माननीय अतिथी  म्हणून उपस्थित होते.
मिस विधी वेर्लेकर, ट्रिनिटी प्राथमिक स्कूल, कुडतरी येखील 9 वर्षाची विद्यार्थीनीने मार्शल आर्टसमधील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत संपूर्ण गोव्यातून एकूण 17 संघासह 2 महिला संघानेही सहभाग घेतला. या वार्षिक 2 दिवसांच्या कार्यक्रमाचा हा उद्देश समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि युवकांना क्रिकेटमधील त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ देणे आहे. कोविड-19 महामारीमुळे 2 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रातीनंतर पाचव्यांदा हा चषक सामना आयोजित करण्यात आला आहे. तसेच या वर्षभरात मोफत आरोग्य तपासणी शिबीरे, रक्तदान  शिबीरे, मोफत पुस्तके वाटप, गरजूंसाठी शैक्षणिक सुविधा, बालदिन समारंभ इत्यादी सामाजिक उपक्रम राबवत असते. याबरोबरच फेस मास्क, सॅनिटायझरचेही वाटप केले आहे. कोविड-19 महामारी दरम्यान आघाडीवर असलेल्या योध्दांना आणि समाजातील सर्व घटकांना कोविड कीट, ऑक्सीमीटर इत्यादींही वितरीत केले आहे.
अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण असोसिएशन यांचे अध्यक्ष प्रशील साळकर यांनी पाहुण्यांचे आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले आणि असोसिएशनने वर्षभरात केलेले सर्व कार्यक्रम, उपक्रम आणि इतर समाजसेवेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन रायकर यांनी  अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण संस्थेने अशा प्रकारचे उपक्रम राबविलेल्याबद्दल त्यांचे कौतूक केले आणि अशा कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल असोसिएशनचे आभार प्रकट केले.

विजेत्या संघासह उपविजेत्या संघाला आणि इतर व्यक्तींना पाहुण्यांकडून ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या भव्य कार्यक्रमात 300 हून अधिक लोक उपस्थित होते. अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राम्हण यांचे सचिव रोहित वेर्णेकर यांनी आभार मानले. तर दीप्ती नागवेकर व वृंदावन रायकर यांनी सूत्रसंचलन केले.
इतर विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे :
उपविजेता- वेर्णेकर वॉरियर्स
मालिकावीर -मनोज हळदणकर
सर्वोत्कृष्ट फलंदाज सिध्देश वेर्लेकर
अंतिम फेरीचा सामनावीर –अमृत वेर्लेकर
सर्वोत्तम झेल- प्रजय हळदणकर
जास्तीत जास्त षटकार – अमृत वेर्लेकर
सर्वोत्कृष्ट आगामी खेळाडू अथर्व वेर्लेकर

महिला उपविजेता संघ- साऊथन स्पार्टन्स
महिला धावपटू – रॉयल स्ट्रायकर्स
रॉयल स्ट्रायकर्स (सामनावीर) महिला – पूजा उसपकर
सर्वोत्कृष्ट गोलंदाज महिला –लिशा लोटलीकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!