गोवा बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर
पणजी:
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (GBSHSE) 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज, शनिवारी (ता. 6) जाहीर करण्यात आला आहे. पर्वरी येथील उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला.
यंदाचा बारावीचा निकाल 95.46 टक्के लागला आहे. एकूण 19 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 18 हजार 497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींचा टक्का 95.88 टक्के असून मुलांचा टक्का 95.03 टक्के इतका आहे. 49 जणांचे निकाल विविध कारणांमुळे राखून ठेवले आहेत.
मंडळाच्या www.gbshse.in तसेच http://results.gbahsegoa.net// या वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल. दरम्यान, दहावीचा निकाल मेच्या मध्यात जाहीर होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकूण 9661 मुलांनी परीक्षा दिली पैकी 9181 मुले उत्तीर्ण झाली. तर 9716 मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 9316 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
शाखानिहाय (फॅकल्टीवाईज) निकाल :
आर्ट्स 4940 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पैकी 4701 उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल 95.16 इतका लागला आहे.
कॉर्मस विभागाचा निकाला सर्वाधिक 96.52 टक्के इतका लागला आहे. या शाखेत 5980 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 5772 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तर विज्ञान विभागाचा निकाल 96.19 टक्के लागला आहे. या शाखेत 5244 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५०४४ जण उत्तीर्ण झाले.
व्होकेशनल विभागात 3213 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 2980 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल 92.75 टक्के लागला आहे.