केएफसी इंडियाने आणले ‘ऑल न्यू लंच स्पेशल्स’
‘आज जेवणात काहीतरी आकर्षक हवे आहे का’ किंवा ‘आपण नंतर भोजन करु. मला काही काम पूर्ण करायचे आहे.’ किंवा ‘ ओह नो,आज लंच में सेम खाना है’ असे विचार जर जेवायच्या वेळी मनात येत असतील तर हात वर करा.
आता ही गरज संपली ! २०२४ मध्ये आता काही गोष्टी बदलणार आहेत, केएफसी तर्फे केएफसी लंच स्पेशल्स या भोजनाच्या श्रेणीची सुरुवात केएफसीच्या आकर्षक अशा रु १४९ पासून सुरु होणार्या किंमतीत उपलब्ध होत आहे.
जसजशी भोजनाची वेळ जवळ येत असते तसतशी भूक अधिक वाढू लागते, त्यामुळे ग्राहकांना आता विविध प्रकारचे भोजनाचे प्रकार उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लाँगर बर्गर्स, रोल्स किंवा राईस बाऊल्स बरोबर आयकॉनिक हॉट ॲन्ड क्रिस्पी चिकन, पेरीपेरी चिकन स्ट्रीप्स किंवा फ्राईज सह चांगली शीतपेये यांचा समावेश आहे. आता प्रत्येक ग्राहकाला शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
केएफसी लंच स्पेशल्स आता केएफसीच्या सर्व रेस्तराँ मध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत उपलब्ध असणार आहे. मग आता तुम्हाला क्रिस्पी, क्रंची, स्वादिष्ट असा लंचटाईम चा पर्याय रु १४९ पासूनच्या किंमतीत उपलब्ध होणार आहे.
केएफसीच्या अन्य पदार्थांसह लंच स्पेशल्स बरोबर आता ग्राहकांना केएफसी ची ५ एक्स सेफ्टी प्रॉमिस म्हणजेच सॅनिटायझेशन, स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि काँटॅक्टलेस सेवां सह लसीकरण केलेल्या टिम्स चे वचन ही उपलब्ध आहे. रेस्तराँ मध्ये सातत्याने स्पर्श होणार्या भागांची नियमित स्वच्छता करुन, टिम मेंर्बस आणि रायडर्स चे वेळोवेळी तापमान तपासले जाते.
केएफसी लंच स्पेशल्स मूळे विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळे भोजनासाठी आता कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही, आता ग्राहक सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत केएफसी रेस्तराँ ला भेट देऊन किंवा टेक अवे किंवा केएफसी ॲप किंवा वेबसाईट (https://online.kfc.co.in/) वरुन ऑर्डर करुन आनंद घेऊ शकतील.