google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

घरगुती एलपीजी सिलिंडर पुन्हा महागला…

एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरही महागला आहे. (LPG Cylinder Price)

महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. होळीपूर्वी नागरिकांना सरकारने झटका दिला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!