मजरे कार्वेत आज ‘शिवजागर’
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी, मजरे कार्वेतील स्वराज्य मल्टीपर्पज हॉलमध्ये सोमवार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता विशेष ‘शिवव्याख्याना’चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर व्याख्यान प्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील देणार आहेत.
या विशेष व्याख्यानाद्वारे नव्या पिढीत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि त्यांनी समाजात घडवलेल्या परिवर्तनाची माहिती प्रामुख्याने देण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुण वर्गाने सामाजिक परिवर्तनावाच्या दिशेने आपल्या विचारांची दिशा ठरवावी आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.