‘त्या’ मुजोर ठेकेदाराला शिवसेनेने शिकवला धडा…
सातारा (महेश पवार) :
बस स्थानकात स्वच्छ्ता गृहातील ठेकेदाराच्या खूप वेळा तक्रारी आल्या होत्या , महिला स्वच्छ्ता गृहातील व्यवस्था साठी महिला कर्मचारी पाहिजे असताना या ठिकाणी उर्मट अश्या परप्रांतीय पुरुष कर्मचारी यांची नेमणूक केली गेली. सर्वसामान्य महिला ,पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता गृहाचा वापर करतात , त्या ठिकाणी महिलांना लज्जा उत्पन होईल अशी भाषा वापरून त्यांच्या कडून जबरदस्ती ज्यासत पैसे वसूल केले जात होते.
तसेच नियमात सुट असणाऱ्या लहान बालक यांच्याकडे देखील पैश्याची मागणी केली जात होती, त्याच बरोबर पुरुषानं कडून ५ रू ऐवजी ७/१० असे वसूल केले जात होते ,या मुळे अनेक नागरिक त्रस्त झाले होते वेळी वेळी एस, टी प्रशासनाकडे मागणी करून देखील आर्थिक तडजोडी मुळे जाणीव पूर्वक याकडे डोळेझाक केली जात आहे असे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे आज शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख, शिवराज टोणपे, संघटक प्रणव सावंत, विभाग प्रमुख इम्रान बागवान, सुमित नाईक सोशल मीडिया उपजिल्हा प्रसिध्दी प्रमुख सागर रायते, युवा सेना सागर धोत्रे, शिवेंद्र ताटे, समीर मोहिते, आण्णा साहेब, आदी शिवसैनिक यांनी बस स्तानक गाठले सर्व सामन्यांची किरकोळ वाटणारी ही लूट महिना अखेर लाखो रुपयांची होत असल्याचे निदर्शनास आल्यावर नालायक अश्या ठेकेदार व त्याच्या कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला व भविष्यात कोणत्याही माता भगिनींना, बंधूंना असा त्रास झाल्यास शिवसेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले .