google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘फ्रेडी’च्या दमदार यशाची झाली जंगी पार्टी

अलीकडेच एकता आर कपूरने ‘फ्रेडी’च्या भव्य यशाबद्दल मुंबईत एक पार्टी आयोजित केली होती. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली एकता आर कपूरद्वारा निर्मित, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून दर्शक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवला. ‘फ्रेडी’हा एकताचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

कंटेंट क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकताने नेहमीच लोकांसोबत एकत्र राहून आनंद साजरा करण्यावर विश्वास ठेवला. अशातच, त्यांनी अलीकडेच एका सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते ज्यात चित्रपटातील कलाकारांचे कुटुंबीय तसेच इंडस्ट्रीतील त्यांचे मित्र देखील उपस्थित होते.


‘फ्रेडी’च्या या सक्सेस बॅशमध्ये कलाकारांसह कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांचा समावेश असून, कार्तिक आर्यन, अलाया एफ, मौनी रॉय, रमेश तौरानी, मधु मंटेना, शशांक घोष, राजेश कृष्णन, आशुतोष गोवारीकर, नीलम कोठारी, समीर सोनी, अयंका बोस, मुकेश भट्ट, विशेष भट्ट, मुकेश छाबरा, मुराद खेतानी, रिद्धी डोगरा, अनिता हसनंदानी, रिधिमा पंडित, मुश्ताक शेख आणि बालाजी मोशन पिक्चर्सच्या सीओओ भाविनी सेठ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!