
अमित पाटकर आणि टीमने दिल्या विजय सरदेसाई यांना शुभेच्छा
पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
माजी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माजी काँग्रेस खजिनदार ऑर्व्हिल डोराडो, सरचिटणीस इव्हर्सन व्हॅलेस व मनीषा उसगांवकर, दक्षिण गोवा माजी जिल्हाध्यक्ष सॅव्हिओ डिसिल्वा, तालीगाव ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर गोवेकर, सांता क्रूझ ब्लॉक अध्यक्ष जॉन नाझरेथ, बाणवलीब्लॉक अध्यक्ष कीथ ग्रासियास, शिरोडा ब्लॉक अध्यक्ष स्नेहलो ग्रासियास, कुर्चोरेम ब्लॉक अध्यक्ष जॉर्ज डिसुझा यांचा समावेश होता.
याशिवाय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान, थिवी जिल्हा पंचायत सदस्य निलेश कांबळी, नुवे जिल्हा पंचायत सदस्य अँथनी सिडली ब्रागांझा, माजी युवा काँग्रेस कार्याध्यक्ष महेश नादर, एआयटीयूसी समन्वयक अॅड. अजय प्रभुगावकर, जेबीएम अध्यक्षा पेलाजिया रापोसो, शमीला सिद्दीकी, दिव्या कुमार तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी विजय सरदेसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.







