गोवा

बेतकी-खांडोळा सरपंच श्रद्धा फडते यांचा भाजपमध्ये प्रवेश

फोंडा (प्रतिनिधी) :
बेतकी-खांडोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा फडते यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. प्रियोळ मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाच्या प्रवेश सोहळ्यात आमदार गोविंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षात प्रवेश केला.


यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वास सतरकर, प्रियोळ भाजप मंडळाचे प्रभारी दीपक नाईक, मंडळ अध्यक्षा अनिशा गावडे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


पक्षप्रवेशानंतर बोलताना आमदार गोविंद गावडे यांनी श्रद्धा फडते यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभवाचा लाभ पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रियोळ मतदारसंघात भाजपचे संघटन अधिक बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात विविध भागांतील युवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नव्या सदस्यांनी समाजसेवा, राष्ट्रहित आणि पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास भाजपचे विविध पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!