
सॅराफीन कोता कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदी; रत्नमाला दिवकार उपाध्यक्षा
मडगाव: ज्येष्ठ कोंकणी कार्यकर्ते सॅराफीन कोता यांची कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी रत्नमाला दिवकार, सरचिटणीसपदी मंगळदास भट, तर खजिनदारपदी डॉ. पुरुषोत्तम वेर्लेकर यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या कोंकणी भाषा मंडळाच्या सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
२०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
संयुक्त सचिव: प्राची प्रभावळकर, प्रमोद सुर्लेकर.
केंद्रीय समिती सदस्य: जुझे लॉरेन्सो, वल्लभ बर्वे, शलाका देसाई, उदय गुडे, श्वेतांग नायक, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसाद पागी आणि गौरांग भांडिये.
तालुका प्रतिनिधी:
काणकोण – अभिजित पागी, केपे – आकाश गावकर, सांगे – जगन्नाथ (मिथुन) गुरव, फोंडा – सुविधा नायक, पेडणे – वेलंकी पेडणेकर, तिसवाडी – सनथ भरणे, सासष्टी – पलाश अग्नी, दिवे – प्रवीण सावंत, सत्तरी – सारिका नायक, धारबांदोडा – प्रसाद पांगम, बार्देश – प्राची प्रभावळकर आणि मुरगाव – प्रमोद सुर्लेकर.
स्वीकृत सदस्य म्हणून परेश च्यारी यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी कोंकणी लेखक आणि शिक्षक अनिल पै यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.






