गोवा

विद्यापीठात ‘कोंकणी’ला विद्यार्थ्यांची अधिक पसंती

पणजी : गोवा विद्यापीठातील भाषा विभागांमध्ये यंदा कोंकणी विषयाला विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. एम.ए. कोंकणी अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, मराठी विभागात ही संख्या १९ इतकी आहे.


प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू असून, येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पहिल्याच टप्प्यात कोंकणी विभागाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय मानला जात आहे.


गोवा विद्यापीठातील कोंकणी विभाग साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. अभ्यासक्रमासोबतच संशोधन आणि साहित्यिक उपक्रमांनाही विभागात प्राधान्य दिले जाते.


कोंकणी विभागाचे प्रा. प्रकाश पर्येकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी ‘सासाय’ या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. तसेच यंदा अखिल गोवा युवा कोंकणी साहित्य संमेलनाचे आयोजनही करण्यात येणार आहे.


गोव्याची राजभाषा असलेल्या कोंकणीकडे उच्च शिक्षणाच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत असून, कोंकणी भाषेच्या शैक्षणिक आणि साहित्यिक भविष्यासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!