साताऱ्यात बहरले पिशव्यांचे झाड!
सातारा (महेश पवार) :
एकीकडे प्लास्टिक पासून पर्यावरण वाचवा असा टाहो फोडून सांगणाऱ्या पर्यावरण प्रेमींना सातारा शहरातील पवई नाका परिसरात नगरपालिका इमारतीच्या चौकामध्ये असणारे हे रस्त्याकडील झाड पाहताच प्लॅस्टिकने आपल्या सर्वांचे जीवन कसे व्यापले आहे , याचेच दाहक दर्शन घडवत आहे.
गेली अनेक महिने झाडावर लटकणाऱ्या या कचऱ्याच्या पिशव्या अक्षरशः सायंकाळ झाल्यावर झाडाला उलट्या टांगून घेणाऱ्या वटवाघळांच्या आकृती सारख्या भीषण दिसत आहेत. यावर पालिकेचा अतिक्रमण विभाग किंवा स्वच्छता विभाग का कारवाई करत नाही .हाच प्रश्न येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना पडतो आणि सातारकर ही किती कोणत्या मनाचे की असे झाड बरबाद करण्यापेक्षा त्यावर अशा कचऱ्याचे पिशव्या टाकण्यात त्यांना धन्यता वाटते का हाच प्रश्न पडत आहे.