देश/जग
जगन मोहन रेड्डी यांच्या चुलत भावाला अटक
हैद्राबाद :
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या चुलत भावाला खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, वायएस कोंडा रेड्डी यांना एका बांधकाम कंपनीला धमकावल्याचा आणि खंडणी उकळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कडप्पा पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या या नेत्याला अटक केली आहे. त्यांच्यावर एका बांधकाम कंपनीच्या मालकाकडून लाच घेतल्याचा आरोप आहे.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.दरम्यान, कन्स्ट्रक्शन कंपनी कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नेत्याची आहे. कडप्पा जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या पुलिवेंदुला मतदारसंघातील वेमपल्ली-रायचोटी रस्त्याच्या पुनर्बांधणीत ही कंपनी गुंतलेली आहे. त्यानंतर, चक्रायपेठ पोलिसांनी आरोपी कोंडा रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. स्थानिक YSR काँग्रेस नेते कोंडा रेड्डी यांच्या कॉल डेटावरुन असे दिसून आले की, त्यांनी अलीकडच्या काळात बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींना अनेक कॉल केले होते.