इफ्फी 53 मधे यावर्षी ‘मॅकाब्रे ड्रीम्स’
इफ्फी 53 मधे ‘मॅकाब्रे ड्रीम्स’ या विशेष पॅकेज अंतर्गत सादर आहे भयपटांचे खास पॅकेज, चित्रपटगृह सोडल्यानंतरही तुम्हाला ते अस्वस्थ करत राहील. “भय ही सार्वत्रिक भाषा आहे; आपण सर्व भयाच्या सावलीत असतो. आपण जन्मापासूनच भयाच्या सावटाखाली आहोत, आपण सर्व गोष्टींना घाबरतो: मृत्यू, विकृती, एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे. मला ज्याची भीती वाटते, त्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला भीती वाटते आणि त्याउलट.” अमेरिकन चित्रपट निर्माते जॉन कारपेंटर यांना ‘ भयपटांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्या आवडत्या चित्रपट शैलीला बद्दल बोलताना थोडी अतिशयोक्ती वाटत नाही ना. काय सांगू? ड्रॅक्युलापासून ते द एक्सॉर्सिस्ट किंवा हेरिडेटरी अथवा कन्जुरिंगपर्यंत, त्या थिजवणाऱ्या भयपटांनी नेहमीच जगभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक देश आणि प्रत्येक भाषेत किमान डझनभर तरी भयपट असतीलच जे त्यांच्या प्रेक्षकांना रोमांचित आणि अस्वस्थ करतात. आपल्यातली जन्मजात भीतीच्या भावना कुशलतेने हाताळून, भयपटांनी जागतिक चित्रपटांच्या या विशाल बहुविधतेमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.
भयपटांची लोकप्रियता पाहता, 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘मॅकाब्रे ड्रीम्स’ सादर करण्यात येत आहे, चित्रपटगृह सोडल्यानंतरही ते चित्रपट रसिकांना भयकंपित करत राहील असे नवे अलौकीक भयपट यात दाखवले जातील.
नाईट सायरन (स्लोवाकीया/ 2022)
नाईट सायरन, हा तेरेझा नव्होटोवा दिग्दर्शित चित्रपट
एका तरुणीची कथा सांगतो. जी तिच्या मूळ डोंगराळ गावात परतते आणि तिच्या खडतर बालपणाबाबतची उत्तरे शोधते. पण ती सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असताना, प्राचीन दंतकथा आधुनिक वास्तवावर आक्रमण करू लागतात, ज्यामुळे गावकरी तिच्यावर जादूटोणा आणि हत्येचा आरोप करतात.
सात भागांमधे हा उत्कट आणि गूढ भयपट उलगडतो. हा आधुनिक काळातील स्लोव्हाकियामधील प्राचीन समजुतींचे पुनरुत्थान आणि आधुनिक जगामध्ये आजही स्त्री द्वेष, परकीयांबद्दलचा गंड, आणि सामूहीक उन्माद यासारख्या समस्या कशा प्रचलित आहेत यावर लक्ष केंद्रित करतो.
मळलेल्या वाटेवरून दूर जाण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा मुक्त होण्यासाठी काय करावे लागते याचीही कथा हा चित्रपट सांगतो.
ह्युसेरा (पेरु / 2022)
ह्युसेरा हा मेक्सिकन चित्रपट निर्माता मिशेल गार्झा सेर्व्हेरा दिग्दर्शित आणि सह-लेखन केलेला एक अलौकिक शारीर भयपट आहे. यात नतालिया सोलियन ही एक गरोदर स्त्री व्हॅलेरियाच्या भूमिकेत आहे, तिला सतत वाटते की सुप्त शक्तींपासून आपल्याला धोका आहे. गरोदर असल्याने, व्हॅलेरिया सतत प्रचंड साशंक आणि व्यापक भीतीच्या सावटाखाली असते. नंतरचे कोळी किटकाच्या उपस्थिती आणि इतर संभाव्य अलौकिक धोक्यांमुळे भय उद्भवते. या भुतांचा सामना करण्याच्या आशेने, तिचे पहिले प्रेम ऑक्टाव्हियासह जुना सांधा जोडत, ती पूर्वीच्या जुन्या आणि अधिक बेदरकार जीवनाशी पुन्हा जोडली जाते,
मेक्सिको आणि पेरूची आंतरराष्ट्रीय सह-निर्मिती असलेल्या, ह्युसेराचा 9 जून 2022 रोजी ट्रिबेका महोत्सवात जागतिक प्रीमियर झाला आणि त्याने सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक आणि नोरा एफ्रॉन हे पुरस्कार जिंकले.
व्हीनस (स्पेन / 2022)
व्हीनस हा एक स्पॅनिश अलौकिक भयपट आहे. शहरी वातावरणात तो घडतो. त्यात आधुनिक जादूटोणा आहे. जौम बालागुएरो दिग्दर्शित हा चित्रपट सहा भागांच्या ‘द फियर कलेक्शन’मधील दुसरा चित्रपट आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ संयुक्तपणे याची निर्मिती करत आहेत. पहिला चित्रपट अॅलेक्स दे ला इग्लेसियाचा व्हीनेसिया फ्रेनिया (2021) होता.
याचे कथानक अमेरिकन लेखक एच पी लव्हक्राफ्टच्या ‘द ड्रीम्स इन द विच हाऊस’ या भयलघुकथेपासून प्रेरित आहे. कथा सुरू होते जेव्हा एक बॅले नर्तिका, काम करत असलेल्या नाईट क्लबमधून गोळ्यांनी भरलेली बॅग चोरते. योजना फिस्कटते आणि गुंडांची टोळी तिचा पाठलाग करते, तेव्हा ती तिच्या बहिणीच्या घरी आश्रय घेण्याचा निर्णय घेते. तथापि, तिथला आश्रय अधिक भयावह असल्याचे दिसते. कथानकापासून ते ध्वनीसंयोजनापर्यंत सारेच अधिक पारंपारिक भयपटांच्या ध्वनी आणि इलेक्ट्रॉनिक संगीताचे शक्तिशाली मिश्रण आहे, ते बालागुएरो लव्हक्राफ्टचे एक विचित्र आणि प्रफुल्लित अद्यतन साकारते.
हॅचिंग (फिनलंड, स्वीडन / 2022)
हॅचिंग या हॅना बर्घोल्म दिग्दर्शित फिनिश मानसिक भयपटाचा प्रीमियर सनडान्स चित्रपट महोत्सवात 23 जानेवारी 2022 रोजी झाला. याने गेरार्डमेर इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स आणि प्रिक्स डु ज्युरी ज्युन्स हे पुरस्कार जिंकले.
हा चित्रपट तिन्जा या तरुण जिम्नॅस्टवर केंद्रीत आहे, तिला आपल्या आईला खूश करायचे आहे, तिन्जा आपल्या लोकप्रिय ब्लॉगद्वारे जगासमोर एक परिपूर्ण कुटुंबाची प्रतिमा सादर करण्यासाठी धडपडते आहे. एके दिवशी, तिला एक रहस्यमय अंडे सापडते, ते ती घरी आणते. त्यातून बाहेर आलेल्या प्राण्याचे नाव ती “एली” ठेवते. तो प्राणी अगदी प्रतिरुप असलेला, तिच्या दडपलेल्या भावनांना वाट देतो म्हणून ती त्याची काळजी घेते.
चित्रपटगृह सोडल्यानंतरही या चित्रपटांनी तुम्हाला पछाडावे अशी आमची इच्छा आहे. पण अहो, कदाचित आम्ही असे म्हणायला हवे होते का की, त्यांना पाहण्याआधीही तुम्हाला अस्वस्थ करु देऊ द्या आणि तुम्ही हे चित्रपट कधीच पाहिले नसतील तरीही? आम्हाला विश्वास आहे की तुम्ही त्यांना पाहण्यासाठी प्रेरित झाला आहात, एकतर इफ्फी 53 मध्ये तुम्ही सोबतच्या चित्रपट प्रेमींसह किंवा किमान इतर कुठेही सिनेमा पाहण्याची ही प्रेरणा आणि उत्साह सामायिक करू शकता.