‘जनासेने’च्या पाठपुराव्याला महत्वाचे यश
काणकोण:
काणकोण कदंब बस स्थानकाच्या दुरावस्थेबद्दल सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जनार्दन भांडारी यांना आणि त्यांच्या ‘जना’सेनेला महत्वाचे यश प्राप्त झाले आहे.
स्थानिक काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते असलेल्या जनार्दन भांडारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कदंब अधिकाऱ्यांकडे काणकोण बसस्थानकाच्या दुरवस्थेबद्दल विचारणा केली होती. आणि नागरिकांची होणारी गैरसोय समोर मांडली होती. त्याचप्रमाणे जर वेळीच यावर योग्य उपाययोजना झाली नाही तर आंदोलन छेडण्याचे आव्हान दिले होते.
जनासेनेच्या या आव्हानानंतर कदंब अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी तातडीने हा विषय पटलावर घेत, शनिवार १६ जुलै रोजी काणकोण बसस्थानकाला भेट दिली आणि स्थानकाच्या डागडुजीेला प्रारंभ केला.
काय होता नेमका विषय?:
‘काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा’