
गोवा
युवा फॉरवर्डच्या राज्याध्यक्षपदी मेसाया (मेशू) डी’कोस्टा
पणजी :
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा आघाडी, ‘युवा फॉरवर्ड’च्या राज्याध्यक्षपदी मेसाया (मेशू) डी’कोस्टा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या नियुक्तीच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, युवा फॉरवर्डच्या संघटनात्मक विस्ताराला गती देणे, राज्यभरातील युवकांना पक्षाशी जोडणे आणि युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने डी’कोस्टा यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाने युवकांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाची युवा संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.







