विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासूया
- अस्लम जमादार
आज रमजान ईद म्हणजेच संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच सुमारे 200 कोटीहून अधिक मुस्लिम ही ईद उत्साहात साजरी करतील असे संकेत आहेत. ह्या ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधव, सेवाभावी संस्था जणू विश्व बंधुत्त्वाचा ‘संदेश’ केवळ ईद मिलनच नव्हे तर रक्तदान, वृक्षारोपण एवढेच नव्हे तर सौदी अरेबिया, यु.के., कॅनडा सह पुण्यातील, अल्पसंख्यांक शैक्षणिक चळवळ ‘अवयवदान’ बद्दल जागरूकता निर्माण करत खर्या अर्थाने प्रेषितांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
आज 3 मे 2022 रोजी साजरी केली जात् आहे. पुढील ईद ही 11 दिवसांनी अलीकडे सरकणार आहे. तर हीच ईद 3 मे रोजी येण्यासाठी इ.स.2055 सालाची वाट पहावी लागणार आहे. हे असे का घडते? ह्याचे प्रमुख कारण इस्लामीक कॅलेंडर (हिजरी) हे चंद्राच्या प्रदक्षिणेवर अर्थात आधारित आहे. इंग्रजी कॅलेंडर हे 365 दिवसांचे एक वर्ष तर ळुनर कॅलेंडर हे 354 ते 355 दिवसांचे आधारित असते त्यामुळे हा 11-12 दिवसाचा फरक पुढील वर्षी अॅडजस्ट न झाल्यामुळे संपूर्ण वर्षभर मुस्लिमांचे महिने व सण फिरत रहातात व तोच क्षण येण्यासाठी (365/11=33) वर्ष वाट पहावी लागते. थोडक्यात एका शतकात किंवा प्रत्येक मानवाच्य आयुष्यात दोन किंवा तीनदाच हा क्षण अनुभवता येतो.
मुस्लिमांबद्दल दुसरे कुतूहल असते ते ‘786’ ह्या संख्येचे ही संख्या केवळ मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीय देखील ‘शुभ’ मानतात. अर्थात ह्या संख्येमध्ये विज्ञान अर्थात गणितीय अभ्यास आहे ते कसे ते पाहू या. हिंदू धर्मात कोणतेही काम सूरू करण्यापूर्वी ज्याप्रमाणे देवी देवतांचे नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मात ‘786’ ही संख्या पवित्र मानली जाते. इंग्रजी मध्ये अ त्े ढ ही अक्षरे अनुक्रमे 1 त्े 26 अशी जोडल्यास अटटीटूडश्र हृ 100 हे आपण पाहिले आहे त्याप्रमाणे ‘बिस्मिल्लाह अल रहमान अल रहीम उर्दू किंवा अरबी भाषेत लिहले गेले असेल तर एकूण शब्दांची संख्या 786 येते त्यामुळेच संपूर्ण अयात (श्लोक) लिहण्याऐवजी 786 लिहण्याची प्रथा सुरू झाली.
प्रेषितांनी 2400 वर्षांपूर्वी मानवहितासाठी अनेक विज्ञानवादी दृष्टिकोन संदेश आणि संशोधन वृत्तीस सर्वोच्च स्थान दिल्याचे दिसून येते. केवळ मानवजातच नव्हे तर सभोवतालचा निसर्ग पक्षी, प्राणी ह्यांचे हिताचे रक्षण करण्याचा मौलिक सल्ला दिल्याचे दिसून येते. विशेषत: मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत वारसा हक्क संपत्तीत तिचा हिस्सा व जन्माला आल्यावर त्या प्रित्यर्थ वृक्षारोपण करून झाडे लावण्याचे व विशेष सगोपन करून ‘ग्लाबल वार्मिंग’ बाबत हजारो वर्षांपूर्वी केलेले सूचित हे विशेष मानावे लागेल.
आज खाद्यपदार्थ पेहराव रंग ह्या द्वारे धर्माधर्मात विभाजन झाल्याचे दिसून येते. परंतू निसर्ग अर्थात अल्लाह/परमेश्वर ह्याने व्यक्ती, लिंगभेद, धर्म, प्रांत असे विभाजन न करता सर्वांच्या रक्ताचे रंग, अवयव हे एकसमानच दिले आहेत हे मात्र आपण दुर्लक्षित करतो. कोरोनाच्या काळात हिंदूंनी मुस्लिमांना रक्त दिले तर मुस्लिम हिंदूजन, अंत्यसंस्कारसाठी धावत आले. हाच खरा मानवधर्म परंतु मुस्लिम म्हणजे ‘हिरवे’ असे समीकरण होवून गेले आहे. इंद्रधनुष्यातील जे सात रंग आहेत. (ता.ना.पि.हि.नि.पां.जा.) त्यात हिरवा हा रंग मधोमध अर्थात बलन्च्ए करणारा आहे. हिरवा ह्याचा अर्थ सूचित करतो की निसर्गाचे संरक्षण आणि आपण ज्या वास्तूत रहातो त्ी जागा व परिसर स्वच्छ ठेवणे परंतु कित्ी जण आपले बांधव हे पाळतात? ते कोडे आहे. प्रेषितांना ‘पांढरा’ रंग हा विशेष पसंत करतात्. अभ्यासातून दिसून येते हा पांढरा हा बस्च्ि रंग असून इतर रंगामध्ये सहज सामाविष्ठ होवून विशेष, लाभदायी नवीन रंग बनवण्याची किमया त्यामध्ये असते. म्हणूनच ह्या पांढर्या रंगाचा आदर्श घेवून आपण समाजात वागलो पाहिजे व आदर्श निर्माण केला पाहिजे असेच प्रेषित सूचित करतात. म्हणूनच संपूर्ण जीवनामध्ये प्रेषितांनी स्वत: पांढर्या रंगाचा पेहराव व पुढे आजतागायत सर्व धर्मगुरू, मुल्ला मौलवी व बहुसंख्य मुस्लिम ‘पांढरा’ रंगाची वस्त्रे पोशाख केल्याचे दिसून येते.
सर्व मुस्लिम ‘मांसाहारी’ असतात असा एक गैरसमज आहे परंतु प्रेषित नेहमी दूध आणि खजूर पसंत करत म्हणूनच ह्या उपवासाच्या काळात ‘उपवास सोडण्यासाठी’ खजूर आणि फळे अधिक पसंती दिली जाते. आजही कित्येक मुस्लिम बांधव एवढेच नव्हे तर ह्या शतकातील महान शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए.पी.जे.कलाम हे पूर्ण शाकाहारी होते हे सर्वांना कल्पना आहेच.
ईदच्या निमित्ताने बनविलेला पदार्थ अर्थात शिरकुर्मा ज्यात दूध व सुकामेव्याचे पदार्थ ह्याचे मिश्रण होवून गोड, स्वादिष्ट पदार्थ बनतो. तद्वत प्रत्येक मुस्लिम बांधवाने प्रेषिताच्या ‘विज्ञान दृष्टिकोना’चा संदेशाचा बारकाईने अभ्यास करून ध्वनी प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग ह्यावर मात करण्यासाठी सज्ज होवून भोंग्याच्या राजकारणामध्ये न अडकता इतर समाजातील बांधवांमध्ये आपल्या कृतीतून गोडवा शिरकुर्मा सारखा कसा निर्माण होईल आणि त्यासाठी प्रयत्न केले गेले ते ‘ईद’ साजरी केल्याचे सार्थक सर्वांना मिळू शकेल.