गोवा

​दत्ता नायक यांनी ​घेतला कोंकणी भाषा मंडळाचा राजीनामा मागे

प्रतिनिधी : ​’जाग’ मासिकातील शणै गोंयबाब यांच्यावरील लेखामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर  लेखक, उद्योजक आणि अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे पदाधिकारी दत्ता दामोदर नायक यांनी ​कोंकणी भाषा मंडळाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा ​आज मागे घेतला​.

​कोंकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष सेराफिन ​ कोता यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मतभेद दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर नायक यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.

नायक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाषा मंडळ हे कोणत्याही राजकीय पक्षाचे व्यासपीठ नसून कोंकणी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेतील मतभेद संवादातून सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.

​दरम्यान, नायक यांनी कोंकणी भाषा मंडळाला जाहीर केलेल्या एका कोटी रुपयांच्या देणगीबाबत निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. संबंधित देणगी आपण देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असून, ​आता त्याबाबतचा अंतिम निर्णय आपला मुलगा चिराग घेईल, असे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी लिहिलेल्या लेखानंतर ​कोंकणी भाषा मंडळाने सार्वजनिक निषेध व्यक्त केल्याबद्दल खेद व्यक्त करत, मतभेदांवर पडदा टाकून संस्थेच्या हितासाठी एकत्र काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!