गोवा

पणजीतील कला अकादमीच्या आवारात कामगाराची हत्या

पणजी : गोव्यातील पणजी येथील कला अकादमीच्या परिसरात एका कामगाराची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. परिसरात सुरू असलेल्या शॉपिंग सेलच्या ठिकाणी ही घटना घडली. मृताच्या डोक्यावर लोखंडी पट्टी किंवा तत्सम जड वस्तूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तपासाच्या दृष्टीने कला अकादमीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच शॉपिंग सेलमध्ये काम करणाऱ्या इतर कामगारांची आणि संभाव्य प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.

पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप हत्येमागील कारण किंवा संशयितांविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!