google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

दिल्ली महापालिकेत ‘केजरीवाल’ सरकार

नवी दिल्ली:

दिल्ली महापालिकेवरील दीड दशकांच्या भाजप (BJP) सत्तेला आम आदमी पक्षाने सुरूंग लावला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आपला बहुमत मिळालं आहे. दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला असून, भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे.



दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाले आहे. काँग्रेसला 7 जागा मिळवता आल्या आहेत, तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाले आहेत. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे.


दरम्यान, अद्याप 17 जागांचे निकाल होती यायचे असले तरी आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजपच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला ‘आप’ने सुरूंग लावल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!